संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

राहुल गांधी वादग्रस्त धर्मगुरू जॉर्ज पोन्नै यांना भेटल्याने वाद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कन्याकुमारी- काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या १५० दिवसांच्या “भारत जोडो’ यात्रेवर आहेत. त्यात शुक्रवारी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात कॅथोलिक चर्चचे वादग्रस्त पाद्री जॉर्ज पोन्नैया यांना भेटले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात बोलताना ख्रिश्चन धर्मगुरूंनी येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे. इतर कोणतीही शक्ती किंवा देवता नाही, असा दावा केला आहे. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत ही “भारत तोडो’ यात्रा असल्याची टीका केली आहे.

काँग्रेसच्या “भारत जोडो’ यात्रेत शुक्रवारी राहुल गांधी यांनी मुट्टीडिचन पराई चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मगुरू जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. त्यावेळी राहुल गांधींनी त्यांना विचारले की, येशू ख्रिस्त हे देवाचे रूप आहे? हे खरे आहे का? असे विचारले. त्यावर जॉर्ज पोन्नैयांनी येशुच खरा देव आहे, असे सांगितले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ख्रिश्चन धर्मगुरू जॉर्ज यांनी यापूर्वीही अनेकदा चिथावणीखोर विधाने केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, द्रमुक प्रमुख व इतरांविरुद्ध अपशब्द वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये मदुराईतील कालीकुडीत त्यांना अटक झाली होती. राहुल गांधींनी त्यांची भेट घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami