संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

राहुल गांधी आणि रावणामध्ये जास्त साम्य! भाजप खासदारचे टीकास्त्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती :- काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केला आहे. नाना पटोले यांनी राहुल गांधी आणि राम यातील ‘रा’ हा रामा सारखा आहे. त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करत आहेत, असे म्हटले होते. त्यावर अनिल बोंडे यांनी टीका केली आहे.राहुल गांधींची तुलना रावणाशी करतानाच त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवर टीका केली आहे.

बोंडे म्हणतात की, नाना पटोलेंना हे समजले पाहिजे की, ‘रा’ पासून राहुल होतो, राम होतो आणि रावण देखील होतो. राहुल गांधी आणि रावणात जास्त साम्य आहे. राम उत्तरेपासून दक्षिणेकडे गेले होते. पण राहुल गांधी उलटे करत आहेत. राहुल गांधी दक्षिणेकडून उत्तरेकडे निघाले आहेत. नाना पटोले यांना अजून राम समजलेला नाही.ते पुढे म्हणतात की, ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती आणि नारे दिले होते, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. म्हणून राहुल गांधी रावणाचे काम करत आहेत, रामाचे नाही. नाना पटोलेंना देखील श्रीराम अजून समजले नाहीत, असा टोला देखील अनिल बोंडे यांनी लगावला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलुरमध्ये या यात्रेचे आगमन होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami