संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

राहुल गांधींच्या भारत जोडो
यात्रेला १०० दिवस पूर्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दौसा: -खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानातील दौसा येथे पोहचली आहे. आज भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले. राहुल गांधींच्या नेतृत्वात या यात्रेने तब्बल दोन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास केला आहे. येत्या काही दिवसात ही यात्रा हरियाणा मार्गे दिल्लीत पोहचणार आहे. या यात्रे दरम्यान राहुल गांधींची वेगळी प्रतिमा निर्माण झाली अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. मागील १०० दिवस भारत जोडो यात्रेत लेखक, अभिनेते, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कार्यकर्ते अशा सर्व स्तरांतली लोकांनी यात्रेमध्ये सहभागी झाले. भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मागील १०० दिवसांत राहुल यांनी तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान अशा 8 राज्यांच्या 42 जिल्ह्यांमधून प्रवास केला.
आज राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बेरोजगारीच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, तिरस्काराच्या विरोधातील आमची ही तपस्या कोणी रोखू शकले नाही. दरम्यान या यात्रेत माजी गव्हर्नर एन रघुराम राजन यांनी देखील हजेरी लावली. रघुराम राजन यांनी भदोती येथून या यात्रेत सहभाग घेतला होता. त्यांनी राहुल गांधींशी प्रदीर्घ चर्चा केली होती.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी ट्विट करत राजन यांच्यावर निशाणा साधला आहे. रघुराम राजन यांना काँग्रेसने नियुक्त केले आहे. त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला यांचे काही आश्चर्य वाटले नाही. ते स्वत:ला पुढील मनमोहन सिंग म्हणून पाहतात, असे अमित मालविया म्हणाले.
आज भारत जोडो‌ यात्रेला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने राहुल गांधी जयपूरला जाणार असून तेथे ते सर्व यात्रेकरूंसोबत सुनिधी चौहान यांच्या संगीत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात्रेला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस शुक्रवारी जयपूरमध्ये एका मैफिलीचे आयोजन करणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या