संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

राहुल गांधींचा भारत जोडो
यात्रेनंतरचा नवा लूक चर्चेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इंग्‍लंड: भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी हे लांब केस आणि वाढलेल्‍या दाढीमध्‍ये दिसले होते. त्यांचा हा लूक बदला आहे. केंब्रिज विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाले असता राहुल गांधी यांचा नवा लूक पहायला मिळाला. त्यात त्यांनी दाढी पूर्णपणे काढली नसली तरी दाढी सेट केलेली आहे. तसेच त्यांनी कोट परिधान केलेला आहे. त्यांचा हा नवा लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी दाढी वाढवली होती. राहुल गांधी दाढी कधी कापणार अशी चर्चा सुरू होती. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या दाढीची तुलना सद्दाम हुसैन यांच्या दाढीशी केली होती. आता राहुल गांधी यांनी आपला लूक बदला आहे. राहुल गांधी सात दिवसांसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत. याआधीच राहुल गांधींचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये राहुल गांधी सुटाबुटात दिसत असून त्यांनी दाढी ट्रिम केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, कोट-टायमधील राहुल गांधींचा जेंटलमन लूक राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या