संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची धामधूम आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता अखेर रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीकडून हिरवा सिग्नल मिळाला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे’, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतून आधीपासूनच एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीसाठी दोघांची वर्णी लागणार असे बोलले जात होते. अखेर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर, एकनाथ खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी पाठवण्यात आले होते, परंतु राज्यपालांनी अजूनही त्यांना मान्यता दिलेली नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami