संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव आता अमृता उद्यान झाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली:- राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीला लागूनच असलेल्या भव्य आयताकार जागेत मुघल गार्डन आहे. मात्र आता याचे नाव बदलण्यात आले आहे.स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या उद्यानांना ‘अमृत उद्यान’ असे नाव दिले आहे, अशी माहिती राष्‍ट्रपती भवनमधील माध्‍यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी दिली आहे.

राष्ट्रपती भवनात असलेले गार्डन हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्‍य केंद्र आहे. हे गार्डन यंदाही ३१ जानेवारीपासून खुले होणार आहे. या गार्डनमध्‍ये ब्रिटीश आणि मुघल दोन्ही उद्यानांची झलक पाहायला मिळते.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक ठिकाणांची नावे बदली गेली. मागील काही वर्षांमध्‍ये अनेक इमारती, संस्था आणि रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. औरंगजेब रोडचे अब्दुल कलाम रोड, नियोजन आयोगाचे नीती आयोग, रेसकोर्स रोडचे लोककल्याण मार्ग आणि फिरोजशाह कोटला स्टेडियमचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या