संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सोनिया गांधींकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवि दिल्ली : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ जयंती. देश-विदेशातील कोटय़वधी लोक स्मरण करून बापूंना आदरांजली वाहतात. बापूंना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी नेत्यांची गर्दी विशेषतः दिल्लीतील राजघाटावर पहायला मिळत आहे. राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनीया गांधी यांनी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचून त्यांना आदरांजली वाहिली आहे. यासोबतच अनेक नेत्यांनीही बापूंना श्रद्धांजली वाहिली आहे.

गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना गांधी जयंतीचे महत्व विशेष असल्याचे ट्विट करत गांधीजींना श्रद्धांजली म्हणून खादी आणि हस्तकला उत्पादने खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे. यासोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनीही बापूंच्या समाधीवर पोहोचून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच बापूंचे स्मरण करत राहुल गांधी यांनी ट्विट केले की, ‘बापूंनी आम्हाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालायला शिकवले. प्रेम, करुणा, सौहार्द आणि मानवता याचा अर्थ समजावून सांगितला. आज गांधी जयंतीच्या दिवशी मी देखील शपथ घेतो, ज्याप्रमाणे त्यांनी अन्यायाविरुद्ध देशाला एकत्र केले, त्याचप्रमाणे आपणही आपला भारत एक करू. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही बापूंना आदरांजली वाहत त्यांचे विचार आणि आदर्श देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देत राहतील, असे ट्विट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami