संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

रायगड जिल्ह्यात आज होणार साखर चौथ गणपतीचे आगमन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पेण- अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता रायगडात पुन्हा गणेशोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी म्हणजेच उद्या मंगळवार १३ सप्टेंबरला साखरचौथ गणेशाचे म्हणजेच गौरा गणपतीचे आगमन होणार आहे.यंदा १३ सप्टेंबरला येत असलेल्या अंगारक चतुर्थीला रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या शेकडो गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात पनवेल, पेण व अलिबाग या तालुक्‍यांमधील संख्या नेहमीच मोठी असते; परंतु आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात हे वातावरण निर्माण होऊ आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेश मूर्तीसाठी भक्तांची तयारी सुरू झाली आहे. साखरचौथीचे सार्वजनिक व घरगुती अशा सुमारे ६०० गणरायांचे वाजत गाजत आगमन होणार आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर गणपतीला खोबरे आणि साखरेचे सारण घालून बनवलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो. म्हणून या गणेशोत्सवाला साखर चौथीचा गणपती उत्सव असे म्हटले जाते. वास्तविक हा उत्सव पूर्वी फक्त पेणमधील गणपती कारखानदार आणि कामगारच साजरा करत होते.कारण भाद्रपदातील गणपती विक्रीसाठी त्यांना गावाबाहेर जावे लागत असल्याने त्यांना आपल्या घरातील आणि र्वजनीक गणेशोत्सवात भाग घेता येत नव्हता. त्यामुळे साखरचौथीची संकल्पना प्रथम याच ठिकाणी अस्तित्वात आली असावी असे सांगितले जाते. मात्र आता ही प्रथा संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू झाल्याचे दिसत आहे. पेण शहरात गुरव आळीचा राजा, रामवाडीचा राजा,श्री दत्त मंडळ,अमर ज्योत मित्र मंडळ,वज्रादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर मित्र मंडळ आणि अन्य छोटी मोठी मंडळे हा साखरचौथीचा गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवात वेगवेगळे देखावे, भजन, कीर्तन,प्रवचन आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जातात. साखरचौथीच्या गणपतीच्या प्रथेला कोणताही लिखित व शास्त्रीय आधार मिळत नाही. कोणतीही पौराणिक कथा यामागे आढळून येत नाही; परंतु वर्षानुवर्षे ही प्रथा सुरू आहे. गणेश हे गणनायक असल्याने त्याच्या स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही.पूर्वी हे गणपती दीड दिवसाचे होते.परंतु गेल्या काही वर्षांपासून काही ठिकाणी या गणपतीची प्रतिष्‍ठापना अडीच व पाच दिवसही करण्यात येते

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami