संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

रायगडच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे ७ नवे मतदार संघ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायगड – रायगड जिल्‍हा परिषद आणि जिल्‍ह्यातील १५ पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणुका पावसाळ्यानंतर होण्‍याची शक्‍यता आहे. या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून त्‍याची अधिसूचना गुरुवारी जारी करण्‍यात आली. त्‍यावर येणाऱ्या हरकतींचा विचार करून ही प्रभागरचना अंतिम करण्‍यात येईल. रायगड जिल्‍हा परिषदेचे सध्‍या ५९ प्रभाग असून नवीन रचनेनुसार प्रभागांची संख्‍या ६६ असणार आहे.

जिल्‍हा प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो राज्‍य सरकारकडे पाठवला होता. सरकारकडून त्‍याला मंजुरी मिळाल्‍यानंतर आता त्‍याची अधिसूचना प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. यामध्ये जिल्‍हा परिषद गटनुसार तसेच पंचायत समिती गणानुसार त्‍यात समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या ग्रामपंचायतींची यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. या प्रारूप आराखड्यावर ८ जूनपर्यंत हरकती सादर करावयाच्‍या आहेत. त्‍यानंतर आलेल्‍या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे अधिसूचनेत स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. नवीन प्रभारचनेनुसार, जिल्‍हा परिषद मतदार संघांची संख्‍या ७ ने वाढणार आहे. यापूर्वी ही संख्‍या ५९ होती, ती आता ६६ करण्‍यात आली आहे. तर पंचायत समिती मतदार संघांची संख्‍या १४ ने वाढली आहे. पूर्वीच्‍या ११८ मतदार संघात वाढ होऊन ती १३२ होणार आहे. आज जाहीर झालेल्‍या अधिसूचनेनुसार प्रभाग आणि त्‍यात समाविष्‍ट गावांवर राजकीय खलबते सुरू झाली आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami