संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

रामदास कदमांचा पुत्र सिध्देशची युवासेनेतून हकालपट्टी का नाही ?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई:- शिवसेनेच्या फूटीनंतर सेनेचे जुने नेते शिंदे गटात गेले आहे. खेडचे माजी आमदार रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम शिंदे गटात गेले आहे.मात्र रामदास कदम यांचे दुसरे पुत्र सिद्धेश रामदास कदम हे ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत आहे. त्यामुळे त्यांना कार्यकारिणीत अजूनही स्थान कसे काय? सवाल उपस्थित होत आहे. सिद्धेश कदम शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत? त्यांची हकालपट्टी अजून का केली नाही? असे प्रश्न विभागप्रमुखांनी विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर राग व्यक्त केला.

दसरा मेळाव्याच्या संदर्भात ठाकरे गटाची शिवसेना भवन येथे महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत कसे? असा प्रश्न विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला.

शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारला? यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारुन घेऊ, असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभागप्रमुख चांगलेच भडकले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami