संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

राफेल नदालने १४ व्यां वेळी फ्रेंच ओपन जिंकली! ३६ व्या वर्षी केला जागतिक विक्रम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पॅरिस – कर्तुत्वाला वयाची मर्यादा नसते हेच खरे आहे. ३६ व्या वर्षी शारीरिक दृष्ट्या फीट राहून एखाद्या स्पर्धेचा खिताब जिंकणे वाटते तितके सोपे नाही . पण अशक्यप्राय वाटणारी हि गोष्ट टेनिस स्टार राफेल नदाल याने शक्य करून दाखवली आहे . त्याने वयाच्या ३६ व्या वर्षी फ्रेंच ओपनचा खिताब जिंकून एक नवा विक्रम घडवला आहे . कारण या वयात चॅंपियनशिप मिळवणारा नडेल हा जगातील पहिलाच खेळाडू आहे फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत त्याने कॅसपेररूड याचा पराभव करून फ्रेंच ओपन स्पर्धा १४ व्या वेळी जिंकली
मधल्या काही काळात नदाल दुखापतग्रस्त होता अगदी फ्रेंच ओपनच्या पहिल्या सत्रात सुधा त्याला दुखापतीचा त्रास होता तरीही त्याने पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्या पण त्यानंतर मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली ज्याचा फायदा त्याला पुढच्या सामन्यात झाला. त्याला सर्वात कडवे आव्हान होते उपांत्य पूर्व फेरीत दुसरा टेनिस स्टार जोकोविच याचे पण त्याने जोकोविचवर मात केली . त्यानंतर मात्र फ्रेंच ओपन नदालच जिंकणार यावर शिक्कामोर्तब झाले होते आणि शेवटी तसेच झाले अंतिम फेरीत त्याच्या समोर रूड होता . रूडला लाल मातीतला सर्वात चांगला टेनिस खेळाडू म्हणून ओळखले जाते पण त्याच्या समोर राफेल नदाल असल्याने अगोदरच त्याचे अवसान गाळले होते त्यामुळे अंतिम फेरीच्या सामन्यात सुरुवातीपासूनच रूड दबावाखाली खेळत होता परिणामी राफेल्साठी हा सामना अधिक सोपा झाला. आणि या एकतर्फी सामन्यात नदालने रूदावर ६-३,६-३,६-० असा एकतर्फी विजय मिळवून फ्रेंच ओपन जिंकली महान टेनिसपट्टू पीट सांप्रास याने त्याच्या कारकिर्दीत १४ ग्रॅन्ड स्लॅम जिंकले तर नदालने १४ व्या वेळी फ्रेंच ओपन जिंकून सर्वात वयस्कर चॅंपियन ठरला आहे नदालच्या या विजयाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami