मुंबई- बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्याविरोधातील बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटचा युक्तीवाद शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात पूर्ण झाला. याचा निकाल कोर्ट 2 मार्चला देणार आहे. याच दिवशी नवनीत राणा यांना अटक होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
आज सुनावणीत राणांच्या वकिलांनी सांगितले की, ‘जात पडताळणीप्रकरण सर्वोच्च न्यायालायात प्रलंबित आहे. त्यावर स्थागिती आहे. याच प्रकरणात 28 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. म्हणून या प्रकरणात कारवाई थांबविण्यात यावी.` मात्र राणांच्या वकिलांच्या युक्तीवादाला मूळ तक्रारदारांच्या वकिलांनी जोरदार विरोध करत दोन्ही प्रकरण वेगवेगळे असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. यावर 2 मार्चला कोर्ट निर्णय देणार आहे.