संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

राज ठाकरे सहकुटुंब सिद्धिविनायक आणि जीएसबी गणपतीच्या चरणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गणेशोत्सवानिमित्त आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब प्रभादेवीच्या सिद्धिविनायक आणि जीएसबी मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. राज ठाकरेंसोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे आणि नातू किआन होता.
सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे यांना मंदिरातील पुजाऱ्यांनी टिळा लावून त्यांच्या खांद्यावर उपरणे घातले, त्याच वेळी अमित ठाकरेंनी आपल्या लेकाला खांद्यावर घेतले. तो किआनला कडेवर झुलवत होता. इतक्यात मंदिरातील पुजाऱ्यांनी त्याला टिळा लावला. त्यामुळे हसत-खेळत असलेला किआन काहीसा हिरमुसला, पुजाऱ्यांनी अमित ठाकरेंच्या खांद्यावर उपरणे घातले. मात्र किआनने ते मुठीने घट्ट धरले. हे पाहून राज ठाकरेंना हसू आवरले नाही. यानंतर राज ठाकरे कुटुंबीय जीएसबी गणपतीच्या दर्शनालाही गेले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami