संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार! संघ कार्यालयात जाणार काय?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे 17 सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असून ते आपल्या दौऱ्याचा आरंभ विदर्भापासून करणार आहे. मात्र,भाजपच्या जवळचे समजले जाणारे राज ठाकरे नागपुरातील राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या कार्यालयात जातील काय?,अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

हिंदूत्वाची भगवी शाल आपल्या अंगावर घेतल्यानंतर राज ठाकरेंची भाजपाच्या नेत्यांसोबत दोस्ती पक्की झाली आहे. भाजपचे बडे नेते शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेटीगाठी घेत आहेत. सध्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरे आपल्या आजारातून बरे झाले असून त्यांनी पुण्यात झालेल्या मनसेच्या सदस्य नोंदणी कार्यालयात हजेरी लावली होती. आता महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे 17 सप्टेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरवातही नागपूरपासून होणार आहे. तेथील आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन ते आपल्या पक्षाची रणनिती ठरवतील. या दौऱ्यात राज ठाकरे हे संघाच्या कार्यालयाला भेट देतील काय? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami