संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पाय आणि कंबर दुखण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. १ जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, मात्र त्यांच्या शरीरात कोविड डेडसेल आढळल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. अखेर लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे. पाय आणि कंबरेच्या दुखण्याच्या त्रासामुळे राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली.

कोविड डेड सेलमुळे ऍनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

दरम्यान, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडे घातले होते. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना केली होती. त्या आरतीसाठी शेकडो मनसैनिक उपस्थित होते. तसेच पुण्यातील भीमाशंकर येथेही राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच मनसैनिकांनी सुप्रसिद्ध शारदा गणपतीला महाआरती करून ५५० नारळाचे तोरण अर्पण केले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami