संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट; ११ जुलैला हजर राहण्याचे आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. सांगलीच्या शिराळ कोर्टाने हे वॉरंट काढले असून ११ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी वॉरंट बजावूनसुद्धा राज ठाकरे चौकशीला हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. आता राज ठाकरे यांना ११ जुलै रोजी सांगली कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

दरम्यान, राज ठाकरेंप्रमाणेच मनसे नेते शिरीष पारकर यांनासुद्धा न्यायालयाने हजर राहण्याचे वॉरंट बजावले होते. त्यानुसार बुधवारी शिरीष पारकर हे न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला आहे. शिरीष यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर आणि ७०० रुपये खर्चाची दंडाची रक्कम भरून न्यायालयाने जामीन दिला आहे. शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली. भारतीय रेल्वेत महाराष्ट्रातील तरुणांना प्राधान्य मिळावे यासाठी २००८ साली मनसेकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटकही केली होती. या घटनेच्या निषेधार्थ मनसेकडून महाराष्ट्रभर आंदोलन पुकारण्यात आले होते. तसेच बंदही पुकारण्यात आला होता. दरम्यान, बंद पुकारण्यात आल्यानंतर शिराळा मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंत आणि इतर काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते. राज ठाकरे यांना ८ जून २०२२ रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र शिरीष पारकर न्यायालयात उपस्थित राहिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami