संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

राज ठाकरेंनी घेतली भराडी देवीचे दर्शन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कणकवली: सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेतली. याप्रसंगी त्यांनी आंगणे कुटुंबियांशी आणि मंदिर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यांच्यासह मनसे नेते उपस्थित आहेत. राज ठाकरे यांचा कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. देवीच्या दर्शनानंतर त्यांनी कणकवलीच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे हे सिंधुदुर्ग,सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली या तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधणार आहेत. सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी ही राज ठाकरे यांचा हा महत्त्वाचा दौरा मानला जात आहे. दरम्यान मालवण येथील प्रसिद्ध वाळूशिल्प कलाकार रविराज चीपकर यांनी मालवण देवबाग समुद्रकिनाऱ्यावर राज ठाकरे यांचे शिल्प तयार केले होते. राज ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami