मुंबई- शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असतात, काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या विधानामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. दरम्यान भिडेंना या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाकडून पाठवलेल्या नोटीसीला कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. दरम्यान आता महिला आयोगाने भिडेंना दुसरी नोटीस पाठवली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणार्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा अशी नोटीस आयोगाकडून 2 नोव्हेेंबर 2022 रोजी बजावण्यात आली होती. यावर अद्याप त्यांच्याकडून खुलासा न आल्याने त्यांना आज पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला विहित मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलेआहे. दरम्यान, भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेेंची मंत्रालयात भेट घेतली होती. त्यानंतर ते बाहेर आल्यावर एका महिला पत्रकाराने तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ असा प्रश्न विचारला. यावर तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रुप आहे. भारत माता विधवा नाही, असे वक्तव्य केले होते.