संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

राज्यात ५ दिवस जोरदार पाऊस ३१ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात पुढील ५ दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांत येलो अलर्ट आणि २ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने आगामी ५ दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्याच्या ३१ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. २ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे व पालघरमध्ये ११ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात १० आणि ११ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तेथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या ९ सप्टेंबरला चंद्रपूर आणि गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट आहे. नंदुरबार, धुळे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड वगळता राज्याच्या अन्य जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात मालाड, अंधेरी, कुलाबा, गोरेगाव, कुर्ला, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पाऊस पडला. कुलाब्यात १,६८८ तर सांताक्रुजमध्ये २,२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami