संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

राज्यात लवकरच सत्ता बदल! ज्योतिषाचार्य अनिकेत शास्त्रींचा भाकीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – राज्यात चार दिवसांपासून सुरू असलेले एकनाथ शिंदेचे बंड पुराण चांगलेच गाजत असताना नाशिकच्या ज्योतिषाचार्य महंत स्वामी अनिकेत शास्त्री महाराज यांनी जोतिष शास्त्रानुसार राज्यात सत्ता बदल होण्याचे भाकीत व्यक्त केली. शनी, मंगळ, राहू, केतू ग्रहांच्या दुष्प्रभावाचा काही राजकीय पक्षांना मोठा फटका बसणार आहे. तसेच पुढच्या काही दिवसात पक्ष फुटणे, सरकार बरखास्त होणे अशा घटना शक्य असून राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्फोटक वातावरण तयार होणार आहे. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत असून येणार्‍या महिन्यात नैसर्गिक आपत्तीची देखील शक्यता असल्याचा दावा ज्योतिष अभ्यासक स्वामी अनिकेत शास्त्रींनी केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या 42 आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami