संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – जून महिनाअखेरीस राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू झालेला पावसाचा जोर आजही कायम आहे. अशातच आता आजपासून पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. कोकणात पावसाचा जोर कायम आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची रिपरिप सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami