संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला! वेण्णा लेक परिसरात ६ अंश तापमान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढत चालला आहे.पुणे, सातारा,नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान घसरले.महाबळेश्वरात तापमान १०.४ अंशांवर पोहोचले.तर वेण्णालेक ६ अंशांवर घसरले.तिकडे धुळ्यातही तापमानात घट झाली आहे.धुळ्यात तापमान ८.२ अंशांवर पोहोचले आहे.नाशिकमध्ये हुडहुडी भरली आहे.तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्याने पुणेकरांचे स्वेटर्स,कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत.रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्याने शेतकरी आनंदला आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरातील तापमामन तब्बल ११ अंशावर तर वेण्णालेक परिसरातील तापमान ६ अंशावर गेले आहे.तर सातारा शहरातीलही तापमान १५ अंशावर गेले आहे.नाशिकचा पारा घसरला अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसानंतर नशिकमध्ये थंडीचे आगमन झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरतोय नाशिकचे तपामन तीन दिवसांत १३ अंश सेल्सिअसवरून १०.४ अंशापर्यंत खाली घसरले आहे.तर निफाडमध्ये ८.१ सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. व्यायाम शाळा जिम, जॉगिंग ट्रॅक हळूहळू गर्दीने फुलून जात असताना गोदा काठावर मात्र सकाळी रेलचेल कमी दिसत आहे. मंदिरांच्या अवती भवती पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर, त्या अडून गोदावरीच्या पाण्यात डोकावणारी सूर्य किरण, त्यामुळे गोदेच्या पाण्याला जणू सोन्याचा मुलामा दिला आहे की काय असा भास होत आहे.

पर्यटकही या थंडीचा आनंद घेत आहेत.एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनेतील चित्र रेखाटावे असे दृश्य सध्या गोदा काठावर दिसत आहे.धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.काल ९ अंशावर असलेले तापमान आज आठ पूर्णांक २ अंशावर येऊन पोहोचल्याने वातावरणातील गारठा चांगलाच वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक एकीकडे शेकोटीचा आधार घेत आहेत तर दुसरीकडे वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने गजबजलेले रस्ते आता निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुके पडलेले बघायला मिळत आहे. ठिकठिकाणी पहाटे आणि भल्या सकाळी लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.नाशिकसह राज्यातील इतर जिह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. तर पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, थंडीपासून बचावासाठी पुणेकर कानटोप्या, स्वेटर घालून चहाचा आस्वाद घेत आहेत.तर कुठे व्यायाम करताना दिसत आहेत.रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्याने शेतकरी आनंदला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami