संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

राज्यात ऐन गणेशोत्सव काळात सलग तीन दिवस अतिवृष्टी होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परभणी – गणरायाचे आगमन झाल्यापासून राज्याच्या काही भागात पाऊसही आपली हजेरी लावताना दिसत आहे. अशातच परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी १८ सप्टेंबर पर्यंत आपला हवामान अंदाज वर्तविला आहे. पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार, ऐन गणेशोत्सव काळातील ८,९,आणि १० सापेन्बर या तीन दिवसांत राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी होणार आहे.तसेच १८ सप्टेंबर पर्यंत पडणाऱ्या पावसांत विजांच्या कडकडाचा समावेश असेल.
गेल्या ऑगस्ट महिन्यातील शेवटचे १५ दिवस पावसाविना कोरडे गेल्याने मराठवाड्यासारख्या भागातील पिके अक्षरशः जळून गेली आहे.पण आता बऱ्यापैकी पाऊस हजेरी लावत आहे.पंजाबराव डख यांनी चालू सप्टेंबर महिन्यातील सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे. त्यात राज्यात १८ सप्टेंबर पर्यत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरणार आहे.खरे तर ४ सप्टेंबर पासून असे वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे.गणेशोत्सव काळातील ८,९,आणि १० हे तीन दिवस अतिवृष्टीचे असून त्याचा प्रत्यय पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र,आणि मराठवाडा या भागात दिसून येणार आहे.राज्यातील छोटेमोठे नदी-नाले व ओढे १८ सप्टेंबरपर्यंत खळखळून वाहताना दिसतील.मात्र या महिन्यातील अतिवृष्टीचा फटका काही भागातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी आपल्या अंदाजात व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami