संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात पुढचे तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. राज्यातल्या ७ जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज रेड अलर्ट आहे. तर मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जम्मू आणि काश्मीरपासून मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami