संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

राज्यातील सर्वात लांब कसारा-इगतपुरी बोगदा जवळपास पूर्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कसारा – मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे अंतर्गत इगतपुरी आणि कसारा दरम्यानचा राज्यातील सर्वात लांब बोगदा बांधून जवळपास पूर्ण झाला आहे. समृद्धी महामार्गावरील या बोगद्यासाठी २३ हजार टन सिमेंट आणि ४०० टनाहून अधिक पोलादाचा वापर केला आहे. ७.७ किलोमीटर लांबीचा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील चौथ्या क्रमांकाचा बोगदा आहे. तो १८ मीटर रुंद आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर कसारा घाटात इगतपुरी आणि कसाऱ्याला जोडणारा बोगदा बांधला जात आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे हे अंतर केवळ ७-८ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी ३० ते ३५ मिनिटे लागतात. न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीचा वापर करून हा बोगदा बांधला आहे. त्यात ४४ लाख टनाहून अधिक खडकाचे उत्खनन केले. स्फोटाने खडक फोडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा अवाढव्य बोगदा बांधला आहे. ७.७ किमीचा हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लांब बोगदा आहे. देशातील तो चौथ्या क्रमांकाचा बोगदा आहे. रुंदीच्याबाबतीत तो देशातील सर्वात रुंद बोगदा आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दोन नळ्यांमध्ये हा बोगदा विभागला आहे. प्रत्येकी तीन लेनचे हे दोन बोगदे आहेत. त्यामुळे मुंबई-नागपूर प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami