संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

राज्यातील सत्तासंघर्षात बहुचर्चित
आ. देवेंद्र भुयारांचा साखरपुडा संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती – राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तर भाजप आणि बंडखोर शिंदे गट हे नव्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करीत आहे. मात्र अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे बहुचर्चित अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सरकार कुणाचे बसेल याची वाट न पाहता काल आपला साखरपुडा उरकून घेतला आहे. राष्ट्रवादीचे आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लाडके असलेले मोर्शीचे देवेंद्र देखील दोनाचे चार हात करण्याची तयारी करीत आहेत.
आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा काल 29 जून रोजी दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात पार पडला.भुयार यांची होणारी वधू दर्यापूर येथील असून मोनाली दिलीपराव राणे असे तिचे नाव आहे.विशेष म्हणजे ती डॉक्टर आहे. विधानसभेत बहुमत चाचणीसाठी आमदार भुयार हे कालच मुंबईसाठी रवाना झाले आहेत.देवेंद्र भुयार हे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते. राजू शेट्टी यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. 10 वर्ष त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी काम केले. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी भुयार यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना मोर्शी मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले. आश्चर्य म्हणजे भुयार यांनी तत्कालिन कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami