संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राज्यातील शाळा
15 जून रोजी सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत. मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी चाईल्ड टास्क फोर्स किंवा आरोग्य विभागाशी आम्ही चर्चा करू. त्यावेळेच्या कोरोना परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणार्‍या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, बारावीचा निकाल लवकरच लागेल. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, एक क्रांतिकारी पाऊल शालेय शिक्षण विभाग टाकत आहे. महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्वजीवी प्रोग्राम या कार्यक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. एचसीएलकडून 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
देण्यात येणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami