संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राज्यातील शाळा १५ जूनपासून पुन्हा गजबजणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – उन्हाळी सुट्टी संपून शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. याबाबत आता शिक्षण विभागाने तारीख घोषित केली आहे. शिक्षण आयुक्तांच्या पत्रानुसार, राज्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. परंतु यंदा कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी शाळांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येणार आहे. म्हणजेच दिनांक १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात याव्या, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. तर, विदर्भातील शाळा मात्र २७ जूनपासून सुरू होणार आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन चौथा सोमवार, म्हणजेच २७ जून रोजी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असली, तरी त्यापूर्वीच्या काही महिन्यांतील कोरोनाची समाधानकारक स्थिती पाहता हळूहळू शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानुसार, उन्हाळी परीक्षा घेण्यात आल्या. तर आता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेनुसार, राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांनी १३ आणि १४ जूनला शाळेत येऊन संपूर्ण शाळेची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करावे, तसेच कोरोनाचे सर्व नियम अचूक पाळावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचना विदर्भ वगळता इतर सर्व जिल्ह्यांसाठी असणार आहेत. विशेष म्हणजे १३ जूनला केवळ पहिलीच्या वर्गांसाठी ‘पहिलं पाऊल’ हा कार्यक्रम होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami