संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

राज्यातील शाळांमध्ये साजरा
होणार आजी, आजोबा दिवस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : आपल्याकडे सध्या सगळेच दिन साजरे करतात. त्यात आता आजी-आजोबांचे नातवंडांशी नाते सांगणारा दिन साजरा करण्याचे परिपत्रकच शासनाकडून जारी करण्यात आले आहे.
आजी-आजोबा दिवस १० सप्टेंबर रोजी असून त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर या दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही, तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस साजरा करावा, असे शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आजी,आजोबांशी असलेल्या या घट्ट नात्याची ओळख होणे पाल्यांच्या सर्वांगिण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असल्यामुळे या दिवशी आजी-आजोबाना पारंपरिक वेषभूषेमध्ये आमंत्रित करून त्यांचा परिचय करून देणे. तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्याचे आयोजन करणे. त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे. तसेच आजीच्या बटव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे. झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे हे उपक्रम राबवण्याचेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या