संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

राज्यातील विविध भागांत मंगळवारपर्यंत पाऊस कायम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- देशाच्या पश्‍चिमेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांत मंगळवार 11 ऑक्टोबरपयर्र्ंत पावसाची हजेरी कायम राहणार आहे. सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणत वादळी वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत मंगळवार 11 ऑक्टोबरपर्यंत, तर मुंबई परिसरात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड, नंदूरबारसह विदर्भातील तुरळक भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami