संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती परीक्षा यंदा येत्या २० जुलै रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.या दिवशी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, मात्र यादिवशी कार्यालयीन कामकाज सुरूच राहील, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

या परीक्षेसाठी तब्बल सात लाख २१ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे १ जुलै रोजीच संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील ४८ हजार ८० शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. इयत्ता पाचवीच्या (पूर्व उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तब्बल चार लाख १७ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख तीन हजार ६९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गासाठी एकूण ५,७०७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान,परीक्षेदिवशी सुट्टी देण्यात आलेल्या शाळांना त्यादिवशीचा अभ्यासक्रम इतर सुट्टीच्या दिवशी भरून काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami