संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
27 फेब्रुवारीपासून! 9 मार्चला अर्थसंकल्प

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 27 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनादरम्यान 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
विधानभवनात बुधवारी सकाळी विधिमंडळ कामकाज समितीची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन पाच आठवडे घेण्यात यावे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यावेळी मांडले. मात्र या बैठकीत 27 फेब्रुवारीपासून चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचे ठरले. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांना अजित पवार म्हणाले की, ‘नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र आता चार आठवड्याचे अधिवेशन होणार आहे. चार आठवड्यांत गुढीपाडव्यासह तीन सुट्ट्या येणार आहे. दोन्ही सभागृहांत चांगल्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी पळवाटा काढू नये, गेल्या अधिवेशनात लक्षवेधीत सत्ताधाऱ्यांना झुकते माप दिले जात होते. प्रश्नांचे योग्य उत्तर मिळत नव्हते. प्रश्नांचे उत्तर द्यायला मंत्रीच सभागृहात नव्हते. त्यामुळे लक्षवेधीला न्याय मिळत नव्हते.`

आजचे हवामान
ताज्या बातम्या