संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम
15 ऑक्टोबरपासून सुरू करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गाळप हंगामाबाबत मंत्री समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून, साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.
या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले. गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकर्‍यांना 42,650 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर असून, राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami