संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

राज्यसभा निवडणूक निकालानंतर
शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यसभेच्या ६ जागांसाठीचे मतदान काल शुक्रवारी पार पडले.भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. या निकालाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार म्हणाले की,मला स्वतःला निकालाने फारसा धक्का बसला नाही.
शरद पवार म्हणाले की, तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर मविआच्या उमेदवारांना जो कोट दिला त्यात काही कमी पडला नाही. सहावी जागा जी शिवसेनेने लढवली त्यात मतांची संख्या अगोदरच कमी होती, भाजपची संख्या जास्त होती. तरीही आम्ही धाडस केलं पण त्यात अपयश आलं. अपक्षांची संख्या आमच्याकडे कमी होती. भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष आमदार होते त्या अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला आहे. बाकी महाविकास आघाडीच्या संख्येप्रमाणे मतदान झालं आहे त्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसं करणं त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही.
पवार पुढे असेही म्हणाले की,मविआच्या किंवा भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. जे काही झालं ते अपक्षांच्या लॉटमधून काही गंमती झाल्या आहे. प्रफुल्ल पटेल यांना एक मत ज्यादा आलं त्याबद्दल पवार म्हणाले की, ते मत शिवसेनेला जाणारं नव्हतं. ते मत विरोधकांच्या कोट्यातलं होतं जे राष्ट्रवादीला आलं. तिथं अनेक असे लोकं आहेत ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणायची त्यांची तयारी नसते. हे एका अपक्षाचं मत होतं पण तो अपक्ष भाजच्या बाजूने होतं.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami