मुंबई – महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. या पाश्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची आज दिवसभर चर्चा सुरु आहे.मात्र त्यानंतर या वृत्ताचे राजभवनाकडून खंडण करण्यात आलं आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होऊन आपल्या राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केली अशी चर्चा आज दिवसभर सुरु होती. मात्र त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोकांनी पैसा काढून घेतला तर काही राहणार नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाबाबत आणि नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, अशी वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे.