संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

राजू श्रीवास्तव पंचतत्त्वात विलीन अंत्ययात्रेत सेलिब्रिटीची उपस्थिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील निगमबोध स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या भावाने पार्थिवाला अग्नि दिला.पंचतत्त्वात विलीन झाला यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सुनील पाल, इसान कुरेशी, मधुर भांडारकर यांच्यासह अनेक चाहते उपस्थित होते.
दिल्लीतील द्वारका येथील दशरथपूर येथे राजू श्रीवास्तव यांच्या भावाचे घर आहे. तेथून आज सकाळी 9.30 वाजता राजू श्रीवास्तव यांची अंत्ययात्रा निघाली. राजूचे चाहते मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. दीड महिन्याहून अधिक काळ व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर अखेर काल वयाच्या 58 व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.त्यानंतर त्यांना 42 दिवस दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर झाली. काल त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. नातेवाईकांव्यतिरिक्त अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटीही राजूच्या घरी अंतिम दर्शन घेतले.
राजू यांच्या अंत्ययात्रेतेच्या वेळी रुग्णवाहिकेवरही फुलांचा वर्षाव करण्यात आला. चाहत्यांनी साश्रू नयनांनी राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप दिला.ओरिसाचे प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनीही राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आज पुरी बीचवर राजू श्रीवास्तव यांचे पोर्ट्रेट असलेली एक कलाकृती बनवली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami