बिकानेर- आयकर विभागाने आज गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून राजस्थानातील बिकानेर, नोखा आणि जोधपूरसह सहा ठिकाणच्या भाजप- कॉंग्रेस नेत्यांसह क्रिकेट सट्टेबाज आणि काही व्यापाऱ्यांवर छापे मारले. ही धडक कारवाई सुरू असताना एका व्यापाऱ्याच्या नातेवाईकाची अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहिला छापा नोखा येथील झंवर ग्रुप वर मारण्यात आला.यावेळी या ग्रुपशी संबंधित असलेले ब्रिजरतन तापडिया यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.या धाडीत चायल ग्रुप आणि राठी ग्रुपवरही कारवाई करण्यात आली. झंवर ग्रुप हा डाळ आणि अन्य धान्याचा व्यापार करतो.या छाप्यात मोठ्या प्रमाणात सोन्या- चांदीचे बेहिशोबी दागिने आढळून आले आहेत.बिकानेर शहरातील स्टार ग्रुपचे जुगल राठी,धनपत चायल आणि दुग्गड ग्रुपवर आज दिवसभर कारवाई सुरू होती.हे दोघे क्रिकेट सट्टा व्यावसायिक आहेत.तसेच राठी हे भाजप आणि चायल कॉंग्रेस पक्षाशी संबंधित आहेत.झंवर हे नोखा पालिकेचे माजी अध्यक्ष आहेत.तर छापे मारलेले हनुमान आणि भगीरथ हे श्रीनिवास झंवर यांचे भाचे आहेत.