संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

राजस्थानचे काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जयपूर- राजस्थानमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भंवरलाल शर्मा यांचे आज सकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास एसएमएस रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. निमोनिया आणि किडनीच्या संसर्गामुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल केले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भंवरलाल शर्मा पायलट समर्थक म्हणून राजस्थानच्या राजकीय वर्तुळात ओळखले जात होते. अशोक गेहलोतांची स्तुती केल्यामुळे अलीकडे ते चर्चेत आले होते. भैरोसिंह शेखावत आणि गेहलोत सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा त्यांच्यावर आरोप होता. राजस्थानच्या चूरू जिल्ह्यातील सरदार शहर मतदार संघाचे ते आमदार होते. एसएमएस रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात त्यांची भेट घेतली होती. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami