कीव्ह – रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे.या युद्धात गेल्या आठवड्यात एक मोठी घटना घडली. युक्रेनची राजधानी कीव्ह इतर शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी युक्रेनने युरोपीय देशांची मदत मागितली आहे.रशियाने १५ नोव्हेंबर रोजी युक्रेनवर १०० हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केल्याने वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन देश अंधारात चाचपडत आहे.
युक्रेन आणि रशियातील युद्ध अनेक महिने सुरु राहिल्याने जगातील बहुतेक देश आणि लोकांनी या घटनेला रशियाचा पराभव म्हणून पाहिले. खुद्द युक्रेननेही हा विजय मानून आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती.मात्र,पुतीन यांच्या मनात काही वेगळेच सुरु होते.रशियाने युक्रेनमध्ये दोन पावले मागे घेतली आणि इतक्या वेगाने हल्ला केला की युक्रेन आतापर्यंतच्या सर्वात वाईट स्थितीत पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात रशियन सैन्याने युक्रेनच्या खेरसन शहरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. पुतीन यांच्या या रणनीतीत युक्रेन अडकले आणि आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर रशियाने १५ नोव्हेंबर रोजी युक्रेनवर १०० हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अर्ध्याहून अधिक पॉवर ग्रीड उद्ध्वस्त झाले असून युक्रेनची राजधानी कीव्हसह इतर शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.