*नव्या महामारीची चाहूल असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा
मॉस्को: जगात पुन्हा एकदा कोरोनापेक्षाही भीषण महामारीचा प्रवेश होऊ शकतो. याचे कारण म्हणजे शास्त्रज्ञांनी ४८,५०० वर्षे जुना घातक विषाणू सापडला आहे. त्यामुळे मानवांसाठी हा एक नवीन धोका निर्माण होत असल्याचा दावा शस्त्रज्ञांकडून केला जात आहे. रशियातील गोठलेल्या अलास सरोवराच्या तळाशी
४८,५०० वर्ष जुन्या झोम्बी विषाणूला फ्रेंच शास्त्रज्ञांनी जिवंत केले आहे. या झोम्बी व्हायरसमुळे मोठ्या साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवामान बदलामुळे प्राचीन पर्माफ्रॉस्ट वितळत आहे. त्यामुळे त्याच्याखाली हजारो वर्षांपासून दडलेले व्हायरस पाण्याबरोबर बाहेर येत आहेत. युरोपियन संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशातील पर्माफ्रॉस्टमधून गोळा केलेल्या या प्राचीन नमुन्यांची तपासणी केली असता यात सापडलेल्या व्हायरसचा संसर्ग अचानक पसरला तर मानवी जिवाला याचा अधिक धोका असेल. विशेष म्हणजे हजारो वर्षे बर्फाच्या जमिनीत अडकूनही ते अस्तित्वात आहेत. म्हणूनच त्यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी १३नवीन व्हायरसना शोधून काढले आहे. त्यापैकीच एक ‘झॉम्बी व्हायरस’ आहे.
या शास्त्रज्ञांनी विविध व्हायरसचे नमुने गोळा केले आहेत. यापैकी पँडोराव्हायरस हा ४८,५०० वर्षे जुना आहे. तर यातील तीन व्हायरस हे ३०,००० वर्षे जुने आहेत. रशियातील युकेची अलास सरोवराच्या तळाशी शास्त्रज्ञांना पँडोराव्हायरस सापडला. तर इतर व्हायरस मॅमथच्या फर किंवा सायबेरियन लांडग्याच्या आतड्यांमध्ये सापडले आहेत. ‘झॉम्बी व्हायरस’चा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं की त्यात संसर्गजन्य असण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे हा व्हायरस मानवी आरोग्यासाठी धोका ठरू शकतो, अस त्याचा दावा आहे.