संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

रशियाच्या लष्करी प्रशिक्षण तळावर दहशतवादी हल्ला!११ ठार, १५ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को- रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरू असताना आता रशियाच्या लष्करी प्रशिक्षण मैदानातच दहशतवादी हल्ला झाल्याची घटना काल शनिवारी घडली.या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यावेळी झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने त्या दोन्ही हल्लेखोरांना ठार मारले आहे.
“युक्रेनविरुद्धच्या युद्धात स्वेच्छेने सहभागी होण्याची काही नागरिकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी बंदूक चालवण्याचे सत्र बेलगोरोड भागात भरवण्यात आले होते.या प्रशिक्षणादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली आहे. चकमकीनंतर दोन हल्लेखोरांना सुरक्षादलांनी ठार मारले आहे.ही दहशतवादी घटना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. युक्रेनजवळ असलेल्या लष्करी भागात ही घटना घडल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.या घटनेतील दोन हल्लेखोर हे भूतपूर्व सोवियत गणराज्याचे नागरिक होते.दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला पोहोचत असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गंभीर इशारा दिला आहे. नाटोच्या फौजांची रशियाच्या लष्कराशी चकमक झाल्यास जगभरात विध्वंस होईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील पुतीन यांच्या या वक्तव्यानंतर जगाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच रशियाच्या लष्करी मैदानावर झालेल्या या हल्ल्यानंतर रशियाचे पुढचे पाऊल काय असेल,याकडे जगाचे लक्ष लागले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami