नवी दिल्ली :गेले वर्षभर रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून युद्ध संपलेले नाही. आता पुन्हा एकदा युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ले होत आहेत. यावेळी रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याने युक्रेनमध्ये हाहाकार उडाला आहे. रशियाने ब्लॅक सीवरून युक्रेनवर किमान ६० क्रूज मिसाइल डागली असल्याने युक्रेनमध्ये चहूबाजूंना स्फोटांचे आवाज होत आहेत.
रशियाने नव्याने बॉम्ब हल्ले सुरू केले असून, यावेळी रशियाने युक्रेनच्या तीन प्रमुख शहरांना टार्गेट केलं आहे. रशियाने केलल्या या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.रशियाने खार्किवमध्ये मुलभूत सुविधा देणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. रशियाने मोठ्या प्रमाणावर मिसाइल हल्ले सुरू केले आहेत. याआधी पूर्ण रशियात युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचे अलार्म वाजवण्यात आले आणि लोकांना आपआपल्या घरांमध्ये राहण्याचं आवाहन करण्यात आले होते. रशियाकडून युक्रेनमधील इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा हल्ला करण्यात आल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. राजधानी कीव, आणि उत्तर पूर्व खार्कीव्ह शहरात स्फोट झाला आहे. रशियाने ऑक्टोबरपासून असे हल्ले युक्रेनवर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण युक्रेनवर पुन्हा एकदा घाबरत पसरली आहे. येथील नागरिकांना घरात राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. आता नव्याने केलेल्या हल्ल्यानंतर शहरातील वीजही गेली आहे.