संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

रशियन गॅस पाईपला गळती! युरोपवर गॅस टंचाईचे संकट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

स्वीडन- युरोपला गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला स्वीडन आणि डेन्मार्कजवळ समुद्राखाली गळती लागली आहे. त्यामुळे युरोपवर गॅसटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अगोदरच युरोपियन देशांना गॅसटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात हे नवे संकट निर्माण झाल्यामुळे युरोपची परिस्थिती आणखी बिकट बनली आहे, असे स्वीडनचे पंतप्रधान मॅण्डालेना अँडरसन यांनी सांगितले.
युरोपियन देशांना गॅस पुरवठा करण्यासाठी रशियाने समुद्रा खालून पाईपलाईन केली आहे. स्वीडन व डेन्मार्कजवळच्या समुद्राखालून रशियाच्या २ गॅस पाईपलाईन जातात. त्यांना गुढरीत्या गळती लागली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे लष्करी कारवाईत ही गळती लागली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. गॅस गळतीमुळे युरोपियन देशांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. युरोपियन देशांवर गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जर्मनी, डॅनिश आणि स्कॅन्डिनेव्हीयन सुरक्षा अधिकाऱ्यांनी या गॅस गळतीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. ही गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न तज्ज्ञांनी सुरू केले आहेत, अशी माहिती नॉर्वेच्या पंतप्रधानांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami