संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

रशियने ‘मेटा’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को- अमेरिकेची प्रसिद्ध टेक कंपनी मेटाविरोधात रशियाने मोठा निर्णय घेतला. मार्क झुकरबर्गची ही कंपनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली. इंस्टाग्राम आणि फेसबुकची मेटा मातृ कंपनी आहे. सोशल मीडियावर रशियाविरुद्ध अपप्रचार केला जात असल्याचा आणि लोकांना भडकवले जात असल्याचा गंभीर आरोप रशियाने मेटावर केला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये रशियाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बंदी घातली होती.
फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. तेव्हापासून सोशल मीडियावर रशियाविरुद्ध अपप्रचार केला जात आहे. इंस्टाग्राम रशियन नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे. ऑनलाइन जाहिराती आणि सेलसाठी हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म मानला जातो. या प्लॅटफॉर्मवरून रशियन लोकाविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा मजकूर पोस्ट केल्याचा आरोप रशियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, मेटाच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांनी रशियाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मेटाने कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. त्यात सहभाग घेतला नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. युक्रेनच्या पॉवर स्टेशनवर हल्ला चढवण्यापूर्वी एक दिवस अगोदर रशियाने हे पाऊल उचलले. क्रिमियाचा पूल उडवल्यानंतर रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले सुरू केले. २४ फेब्रुवारीला युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर रशिया सोशल मीडियावर करी नजर ठेवत आहे. त्यात युरोपियन सोशल मीडिया कंपन्यांना टार्गेट केले जात आहे. रशियन मिडिया त्या बंद करत आहेत. आता मेटाला ब्लॉक करून दहशतवादी संघटना म्हणून रशियाने घोषित केले आहे. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami