संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

योगी सरकारच्या मदरसा सर्वेक्षणावर ओवेसींची टीका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ : योगी आदित्यनाथ सरकारने मान्यताप्राप्त मदरशांच्या मूलभूत सुविधांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशामुळे मदरशांचे आता कायदेशीर सर्वेक्षण होणार आहे. राज्याचे उपसचिव शकील अहमद सिद्दीकी यांच्याकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, १० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षणासाठी एक पथक तैनात केले जाणार आहे. मात्र या निर्णयाला एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी विरोध केली आहे. मदरसे कलम ३० नुसार आहेत, मग यूपी सरकारने सर्वेक्षणाचे आदेश का दिले? हे सर्वेक्षण नसून मिनी एनआरसी आहे, अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली आहे.काही मदरसे यूपी मदरसा बोर्डाच्या अंतर्गत आहेत. कलम ३० अंतर्गत आमच्या अधिकारांमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांना मुस्लिमांना त्रास द्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवेसींनी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami