संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

येवल्यात अफगाणिस्तानी मुस्लिम धर्मगुरुची गोळ्या झाडून हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – पैशाच्या वादातून अफगाणिस्तानी मुस्लिम धर्मगुरुची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना येवला तालुक्याच्या चिचोंडी येथील एमआयडीसीमध्ये घडल्याने खळबळ उडाली. सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती, असे मृत अफगाणिस्तानी नागरिकाचे नाव आहे. ही हत्या सुफी यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाला आहे. येवल्यात सुफी बाबा म्हणून ते ओळखले जात होते.

मुंबईपासून 200 किमी अंतरावर असलेल्या येवला शहराच्या एमआयडीसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर सुफी चिस्तीची डोक्यात गोळी घालून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर वाहनातून आरोपी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती येवला शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले गेले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार उशिरा रात्री गुन्हा दाखल झाला असून तिघांविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami