संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

यूट्यूबर गौरव तनेजाचा जामीन मंजूर; वाढदिवसाला झाली हाेती अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील नोएडा येथून पोलिसांच्या अटकेत असलेला यूट्यूबर गौरव तनेजा याची मुक्तता करण्यात आली आहे. शनिवारी गाैरव तनेजा याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या कारणास्तव गाैरवला अटक झाली हाेती.

‘फ्लाइंग बीस्ट’ या यूट्यूबवरील चॅनलमुळे तनेजा हा लाेकप्रिय आहे. त्याने नोएडातील सेक्टर ५१ मेट्रो स्टेशनवर त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे नियाेजन केले. शनिवारी तनेजाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती ज्यात चाहत्यांना मेट्रो स्टेशनवर जमण्यास सांगितले गेले. यानंतर सेक्टर ५१ मेट्रो स्टेशनवर हजारो नागरिक जमा झाल्याने चेंगराचेंगरी झाली, असे सांगितले जात आहे. गौरव तनेजाचे इंस्टाग्रामवर ३.३ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

गौरवची पत्नी रितू राठी हिने मेट्राे स्टेशन येथे तनेजा वाढदिवस साजरा करेल आणि केक कापेल अशी पाेस्ट शनिवारी सकाळी इन्स्टाग्रामवर केली होती. तसेच नियमांचे पालन करुया, लवकरच भेटू, असेही लिहिले होते. त्यानंतर घटनास्थळी माेठा जमाव जमला हाेता. नोएडामधील कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढू नये यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन तनेजाने केल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली हाेती. अटक झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच गौरव तनेजा ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला हाेता. दरम्यान, रात्री उशिरा गाैरव याने साेशल मिडियावर आपल्या कुटुंबासह एक छायाचित्र पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याची जामीनावर मुक्तता झाल्याने त्याचे चाहते खूष झाले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami