संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

यूएईने 1000 ची नवीन दिरहम नोट जारी केली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दुबई : संयुक्त अरब अमिरात (युएई)ने आपल्या ५१व्या राष्ट्रीय दिनानिमित्त १,००० दिरहम (सुमारे २२,१३९ रुपये)चे नवीन चलनी नोट जारी केले. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, ही नोट पॉलिमरपासून बनली आहे. २०२३ च्या पहिल्या सहामाहीपासून सेंट्रल बँकेच्या शाखा आणि एटीएममध्ये उपलब्ध असेल.या नोटेतून देशाचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.2023 पर्यंत ही नोट सेंट्रल बँकेच्या शाखा आणि एटीएममध्ये उपलब्ध होईल. या नोटेवर शेख झायेद, होप प्रोब आणि बरकाह न्यूक्लियर पॉवर प्लांटची छायाचित्रे आहेत.याशिवाय, त्यामागे एका वनस्पतीचेही चित्र आहे, जे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेली पावले दाखवते. या नोटमध्ये अॅडव्हान्स सिक्युरिटी फीचर्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बनावट नोटांना आळा बसेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami