संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

युपी व बिहार ! गयी मोदी सरकार! समाजवादी पार्टीचा पोस्टर चर्चेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ -लखनऊमधील समाजवादी पार्टीच्या कार्यालयासमोर एक बॅनर लावण्यात आला असून सध्या तो खूप चर्चेत आला आहे. त्यावर लिहिले आहे की , ‘यूपी + बिहार = गया मोदी सरकार’. हे बॅनर सपा प्रवक्ते आयपी सिंह यांनी लावले आहेत. या बॅनरवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे छायाचित्र आहे. 2024 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विरोधात नितीश आणि अखिलेश आघाडीवर आहेत का, अशी चर्चा आता या पोस्टरवरून सुरु झाली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीएशी युती तोडली आणि बिहारमध्ये आरजेडीसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे त्यांची प्रतिमा भाजपला सत्तेतून बाहेर काढणाऱ्या नेत्याची बनली आहे. सध्या नितीश कुमार एनडीएच्या विरोधात नवी आघाडी उभारण्याच्या कसरतीत मग्न आहेत. त्यांनी नुकतीच दिल्लीत विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली.समाजवादी पार्टी मिडीयाने फोटो ट्वीट करत म्हटले आहे की, यूपी+बिहार = भाजपचे सरकार गेले. यूपीमधील 80 आणि बिहारमधील 40 अशा एकूण 120 जागा आहेत. या 120 जागांवर खेळ होईल. या 120 जागांवर भाजपचा पराभव होईल. 2024 या 120 जागांवर सपा, आरजेडी, जेडीयू मिळून भाजपचा पराभव करतील. यूपीमध्ये अखिलेशजींच्या नेतृत्वाखाली फक्त सपाच भाजपचा पराभव करेल. अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचीही भेट घेतली होती. यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, आपल्या सर्वांचे ध्येय एकच आहे, सर्वांना मिळून भाजपला हटवायचे आहे. त्याचवेळी, विरोधकांच्या एकजुटीत अखिलेश यादव यांच्या भूमिकेबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, सपा अध्यक्ष यूपीचे पुढे नेतृत्व करतील.

सुमारे दीड वर्षांनी देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपकडून नरेंद्र मोदींकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. अशा स्थितीत विरोधी छावणीतही खळबळ उडाली आहे. एकीकडे देशातील सर्वात जुना आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढत आहे. त्याचबरोबर विरोधी आघाडीतही कसरत सुरू झाली आहे.संभाव्य उमेदवार म्हणून अनेक बडे चेहरे मानले जात आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून नितीशकुमार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami