लखनऊ – उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना येथील कस्बा पाढममध्ये ३ मजली इमारतीला भीषण आग लागली. त्यात एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या बेसमेंटमध्ये फर्निचरचा शोरूम होता. त्याला आग लागली होती.
जसरानाच्या कस्बा पाढममधील मुख्य बाजारपेठेत एका व्यावसायिकाची ३ मजली इमारत आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये फर्निचरचा शोरूम आहे. तेथे मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. फर्निचरला लागलेली आग भडकल्यामुळे संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली. त्यात एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामन दलाच्या जवानांनी ३ तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत २ महिला एक तरुण आणि ३ लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर व्यापाराची दोन मुले आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. आगीचे कारण समजलेले नाही, असे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.